Quantcast
Channel: EenaduIndia | इतर क्रीडावृत्त
Viewing all 1366 articles
Browse latest View live

गेल इंडियाच्या वतीने धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन

$
0
0
नाशिक - गेल इंडिया व नॅशनल युवा को-ऑप सोसायटीच्या वतीने देशभर जवळपास ७०० जिल्ह्यात १००, २०० आणि ४०० मीटर धावण्याचा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सन २०२० मध्ये टोकियो(जपान) येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी चांगले खेळाडू मिळावेत आणि भारताला पदक मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन संपूर्ण देशभर करण्यात आले आहे.

३६ व्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेला सुरुवात

$
0
0
पुणे - पुण्यातील सीएमई येथे ३६ व्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दहा डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे.

हॉकी वर्ल्ड लीग : बेल्जियमला नमवून भारत उपांत्य फेरीत

$
0
0
भुवनेश्वर - हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात बेलिज्यमला नमवून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

वसई-विरार महापौर मॅरेथॉन १० डिसेंबरला

$
0
0
पालघर - वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा १० डिसेंबर रोजी होणार असून मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गात कोणताही बदल केला जाणार नाही. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सातव्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेची उपमहापौर उमेश नाईक यांनी पालिकेच्या सी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळीत त्यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

$
0
0
मुंबई - महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या सत्राला टाटा समूहाचे प्रायोजकत्व मिळणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन वर्षायाच्या प्रारंभातील ही एटीपी वर्ल्ड टूर मालिकेतील ही पहिलीच स्पर्धा असून पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात १ ते ६ जानेवारी २०१८ दरम्यान पार पडणार आहे.

'जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज ठरणार अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी'

$
0
0
ठाणे - अंबरनाथ शहर हे ऑलिंपिक दर्जाचे नेमबाज घडवण्यासाठी सज्ज झाले आहे. या ठिकाणी उभे राहणारे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज हे अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. या शूटिंग रेंजसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी याप्रसंगी अभिनंदन केले.

वर्ल्ड हॉकी लीग : उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाची भारतावर १-० ने मात

$
0
0
भुवनेश्वर - भर पावसात सुरू झालेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये भारताचा घरच्या मैदानावर पराभव झाला. गोन्झालो पिलेटने केलेल्या गोलमुळेच रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाने भारतावर १-० अशी मात केली. अर्जेटिनाच्या गोन्झालो पिलेटने १७ व्या मिनिटाला मिळालेल्या हुकमी संधीचा फायदा उचलत या सामन्याच्या एकमेव गोल केला. उपांत्यपूर्व फेरीत भारताने बलाढ्य बेल्जियमला नमविले होते.

शार्दुल मेहेतरची १७ वर्षीय शालेय महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड

$
0
0
रायगड - जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील महाळुंगे येथील शार्दुल उल्हास मेहेतर याची १७ वर्षीय शालेय महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ९ ते १२ डिसेंबरदरम्यान आंध्रप्रदेश येथे होत आहे. यासाठी महाराष्ट्राचा संघ रवाना झाला आहे.

एक्वाटिक चॅम्पियनशिप २०१७: भारतीय संघाची दमदार कामगिरी

$
0
0
जाकार्ता - एक्वाटिक चॅम्पियनशिप २०१७ मध्ये भारतीय संघाने घवघवीत यश मिळवले आहे. पाच दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने १ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कास्य पदके पटकावली आहेत.

जर्मनीला २-१ ने हारवून भारताने कोरले कांस्य पदकावर नाव

$
0
0
भुवनेश्वर - भारतीय संघाने जर्मनीला २-१ फरकाने नमवत हॉकी वर्ल्ड लीगच्या अंतिम सामन्यात कांस्य पदकावर नाव कोरले आहे. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये भारताकडून खेळणाऱ्या एसवी सुनीलने २० व्या मिनिटाना गोल करत भारताला जर्मनीच्या पुढे नेले. मात्र मार्क एपलने ३६ व्या मिनिटाला गोल करत पुन्हा बरोबरी साधली.

'शेलारमामा चषका'साठी मुंबईत रंगणार निकराची झुंज !

$
0
0
कबड्डी हा मराठमोळ्या मातीतला रांगडा खेळ. देशातील प्रत्येकाने लहानपणी हा खेळ खेळला असणारच. 'प्रो-कबड्डी लीग' मुळे कबड्डीला ग्लॅमर मिळालं असलं तरी स्थानिक पातळीवरील खेळाडूंना योग्य व्यासपीठ आजही उपलब्ध नाही.

दुबई सुपर सीरिज फायनल्स : यामागुचीला नमवत 'सिंधु'चा सलग तिसरा विजय

$
0
0
दुबई - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत जपानच्या अकेन यामागुचीला पराभूत केले. हमादान स्पोर्ट्स कॉम्पलेक्स येथे खेळल्या जात असलेल्या दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील सिंधुचा हा सलग तिसरा विजय आहे.

दुबई सुपर सीरिज; सिंधूची अंतिम फेरीत धडक

$
0
0
दुबई - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफायला नमवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये आठव्या क्रमांकावर असलेल्या युफायला सिंधूने २१-१५, २१-१८ ने पराभूत केले.

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे घवघवीत यश

$
0
0
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताला नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्यपदके मिळाली आहेत. भारताच्या महिला कुस्ती पथकाने सर्व वजनी गटांमध्ये पदके मिळवली.

दुबई ओपन अंतिम फेरी : सिंधूला नमवत यामागुची विजयी

$
0
0
दुबई - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू दुबई वर्ल्ड सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाली आहे. तिला जपानच्या अकेने यामागुचीने २१-१५, १२-२१, १९-२१, असे पराभूत केले. सिंधू या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी चौथी भारतीय खेळाडू ठरली होती.

कॉमनवेल्थ : सुशील कुमार, साक्षी मलिक 'कुस्ती चॅम्पियन'

$
0
0
नवी दिल्ली - भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार आणि साक्षी मलिक या कुस्तीपटूंनी कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटातील अंतिम लढतीत सुवर्णपदक पटकावत सुशील कुमारने दमदार पुनरागमन केले आहे.

महाराष्ट्र केसरी : पुण्याच्या स्वप्नील शेलार, अजिंक्य भिलारे यांची आगेकूच

$
0
0
पुणे - ६१ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलार आणि अजिंक्य भिलारे यांनी सकाळच्या सत्रात आपापल्या विरोधकांवर मात करून आगेकूच केली आहे.

विजय भोयर ठरला 'आझाद श्री' किताबाचा मानकरी

$
0
0
अमरावती - अमरावती महानगरपालिका आणि आझाद हिंद मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत विजय भोयर हा 'आझाद श्री' किताबाचा मानकरी ठरला आहे. राज्यभरातील १५० स्पर्धेकांनी या स्पर्धेत विविध वजनीगटांत सहभाग नोंदविला. तर सर्वेश साहू हा बेस्ट पोजर किताबाचा मानकरी ठरला.

कोण होणार 'महाराष्ट्र केसरी ?, अभिजीत-किरणमध्ये आज अंतिम लढत

$
0
0
पुणे - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढत पुण्याचा अभिजित कटके आणि साताऱ्याचा किरण भगत यांच्यात रंगणार आहे. अभिजित गादी विभागात विजयी ठरला, तर माती विभागात किरणने बाजी मारली. अंतिम लढत आज सायंकाळी होणार आहे. आता कोण कोणाला अस्मान दाखवणार आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता सर्व कुस्तीप्रेमींना लागली आहे.

घाणाच्या अमुझुवर मात करत विजेंदरचा सलग दहावा विजय

$
0
0
जयपूर - बॉक्सर विजेंदर सिंहने शनिवारी सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आफ्रीकन चॅम्पियन अर्नेस्ट अमुझुच्या विरोधात आक्रमक खेळी केली. यावेळी त्याने डब्ल्यूबीओ ओरिएंटल आणि एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा किताब आपल्या नावे केला. हा विजेंदरचा सलग १० वा विजय ठरला आहे.
Viewing all 1366 articles
Browse latest View live




Latest Images