Quantcast
Channel: EenaduIndia | इतर क्रीडावृत्त
Viewing all 1366 articles
Browse latest View live

World Badminton Championship : भारतीय खेळाडूंची दमदार सुरुवात

$
0
0
नँजिंग (चीन) - सोमवारपासून सुरू झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी पहिल्या दिवशी चमकदार कामगिरी करत विजयी सुरुवात केली आहे. पुरूष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमिथ रेड्डी यांच्या जोडीने विजय मिळवला तर पुरूष एकेरीत एच एस प्रणॉयने आणि समीर वर्मा यांनी वैयक्तीक विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मात्र महिला दुहेरीच्या सामन्यात संजोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत या जोडीला पराभव पत्करावा लागला आहे.

World Badminton Championship : सायनाची विजयी सलामी, पुढच्या फेरीत धडक

$
0
0
नानजिंग - चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. महिला एकेरीत मंगळवारी झालेल्या सामन्यात सायनाने तुर्कीच्या अली डेमीबर्गचा २१-१७, २१-८ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह सायनाने पुढच्या फेरीत धडक मारली आहे.

जॉन सिना आणि निकी बेला करतायत लग्न

$
0
0
वॉशिंग्टन - अमेरिकन डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सिना आणि निकी बेला यांचा विवाह ५ मे रोजी होणार आहे. सोशल मीडियावरून त्यांनी लग्नाची माहिती दिली आहे. एप्रिल महिन्यात या दोघांनी रिलेशनशीप तोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण पुन्हा ते दोघे एकत्र आले आहेत.

महिला हॉकी विश्वचषक : बाद फेरीत आज भारताचा सामना इटलीशी

$
0
0
लंडन - महिला हॉकी विश्वचषकाच्या बाद फेरीतल्या करो या मरोच्या लढतीत भारताचा सामना आज इटलीविरुद्ध होणार आहे. विश्वचषकात आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामन्यात कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. कर्णधार राणी रामपाल ही संघाची सर्वात भरवशाची आणि अनुभवी खेळाडू आहे. राणी शिवाय वंदना कटारिया, गुरजित यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

व्यस्त वेळापत्रक आणि दीर्घायुषी करिअरसाठी 'रॉजर्स' कपमधून माघार - फेडरर

$
0
0
लंडन - व्यस्त वेळापत्रकामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या रॉजर्स कपमधून स्वीत्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडररने माघार घेतली आहे. ३६ वर्षीय रॉजर फेडरर म्हणाला, की मी गेल्यावर्षी या टुर्नामेंटमध्ये खेळाचा खुप आनंद घेतला होता. पण माझ्या दीर्घायुषी करिअरकडे पाहता मी यंदा या स्पर्धेत भाग घेत नाही.

महिला हॉकी विश्वचषक : इटलीला धूळ चारत भारत उपांत्यपूर्व फेरीत

$
0
0
लंडन - महिला हॉकी विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीत भारताने इटलीवर ३-० ने मात करुन उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

फिसेक गेम्स : पुण्याच्या सिद्धांत खोपडेची चमकदार कामगिरी

$
0
0
पुणे - गेन्क (बेल्जियम) येथे पार पडलेल्या ७० व्या फिसेक-फायसेप गेम्स २०१८ मध्ये स्कूल स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचा जलतरणपटू सिद्धांत खोपडे याने उत्कृष्ट कामगिरी करत, दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. याबाबत माहिती स्कूल स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी दिली.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

$
0
0
नानजिंग (चीन) - भारताचा स्टार बॉडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने बुधवारी झालेल्या लढतीत स्पेनच्या पॅब्लो अॅबीयनचे आव्हान 21-15, 12-21, 21-14 असे मोडून काढले.

विश्वचषकातील भारतीय महिला हॉकी संघातून महाराष्ट्र गायब !

$
0
0
हैदराबाद - इंग्लंडमध्ये महिला हॉकी विश्वचषकाच्या महासंग्रामास २१ जुलैपासुन इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला आहे. तब्बल आठ वर्षांनंतर एफआयएच विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघाने पुनरागमन करत जोरदार कामगिरी केली आहे. मंगळवारी झालेल्या बाद फेरीतील सामन्यात भारताने इटलीवर ३-० ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

World Badminton Championship : पी.व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

$
0
0
नानजिंग (चीन) - भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयी घोडदौड सुरूच आहे. तिने बुधवारी महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरात इंडोनेशियाच्या फित्रीयानीचा २१-१४, २१-९ च्या फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.

आठ वर्षानंतर भारताने विश्वचषक स्पर्धेत मिळवला विजय

$
0
0
लंडन - मंगळवारी बाद फेरीत झालेल्या सामन्यात भारताने इटलीचा ३-० ने धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तब्बल आठ वर्षानंतर भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवण्यात यश आले आहे.

महिला हॉकी विश्वचषक - उपांत्यपूर्व फेरीत आज भारत भिडणार आयर्लंडशी

$
0
0
लंडन - महिला हॉकी उपांत्यपूर्व फेरीत गुरवारी भारत आयर्लंडशी दोन हात करणार आहे. विश्वचषकात आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही संघाना या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे.

भारताला मोठा धक्का, जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

$
0
0
नानजिंग (चीन) - भारताचा अव्वल बॉडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभवचा धक्का बसला आहे. या पराभवानंतर किदम्बीचे या स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे.

World Badminton Championship - भारताची फुलराणी सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

$
0
0
नानजिंग (चीन) - जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने उपउपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला आहे. गुरवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सायनाने थायलंडच्या रॅटचानोक इंटानॉनचा २१-१६, २१-१९ अशा फरकाने पराभव केला.

सेरेना विल्यम्सचा कारकीर्दीतीला सर्वात लाजिरवाणा पराभव

$
0
0
लॉस एंजेलिस - टेनिस विश्वात सेरेना विल्यम्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा तिच्या विजयाची नसून बुधवारी कॅलिफोर्नियातील सॅन जोस डब्ल्यूटीए स्पर्धेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची आहे.

आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंकडून सुवर्णपदकांची लयलूट

$
0
0
ठाणे - आंतरराष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक संघटनेतर्फे थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांची अक्षरशः लयलूट केली. आपल्या खेळाचे चमकदार प्रदर्शन करत या खेळाडूंनी थायलंडमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. विशेष म्हणजे या स्पर्धेत पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंचा धुव्वा उडवत भारतीय संघ आघाडीवर होता.

महिला विश्वचषक : भारताचे आव्हान संपुष्टात, आयर्लंडकडून पराभूत

$
0
0
लंडन - महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान काल संपुष्टात आले. भारतविरुद्ध आयर्लंडमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आयर्लंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ ने भारताला पराभूत केले.

तुम्ही जी चर्चा ऐकत आहात ती बरोबर आहे, ईशाचा अफेयरबाबत खुलासा

$
0
0
मुंबई - भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पंड्या हा काहीना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता अभिनेत्री ईशा गुप्ताच्या रिलेशनशिपमुळे तो चर्चेत आला आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. यावर ईशा गुप्ताने हार्दिकसोबतच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

WWE स्टार केन आता राजकारणाच्या रिंगणात, महापौरपदाची निवडणूक जिंकला

$
0
0
टेनेसी - डब्ल्यूडब्ल्यूई रिंग गाजवणारा रेसलर ग्लेन जेकब्ज अर्थात केन आता राजकारणाच्या रिंगणात उतरला आहे. केनने नुकतीच अमेरिकेतील टेनेसीमधील नॉक्स या कौंटी शहरासाठी झालेली महापौरपदाची (मेयर) निवडणूक जिंकली आहे. तो रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होता.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 'फुलराणी'चा पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

$
0
0
नानजिंग (चीन) - जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॉडमिंटनपटू सायना नेहवालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कॅरोलिनाने सायनाचा २१-६, २१-११ असा सरळ सेटमध्ये मोठ्या फरकाने पराभव केला.
Viewing all 1366 articles
Browse latest View live




Latest Images