Quantcast
Channel: EenaduIndia | इतर क्रीडावृत्त
Viewing all 1366 articles
Browse latest View live

VIDEO : पराभवामुळे अनावर झालेल्या रागातून मोडली रॅकेट, ११ लाखांचा दंड

0
0
हैदराबाद - वॉशिंग्टन ओपनमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात बेनोईट पायरे या खेळाडूला एटीपीने ११ लाखांचा दंड ठोठावला आहे. सामना हरल्यानंतर रागाच्या भरात टेनिस कोर्टवर आपले दोन रॅकेट आपटून मोडल्यामुळे हा दंड पायरेला करण्यात आला आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सायनापोठोपाठ साई प्रणितचेही आव्हान संपुष्टात

0
0
नानजिंग (चीन) - जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॉडमिंटनपटू साई प्रणितला धक्का बसला आहे. शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या केंटो मोमोटाने प्रणितचा २१-१२, २१-१२ असा पराभव करत हा सामना आपल्या नावावर केला. या पराभवानंतर साई प्रणितचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक

0
0
नानजिंग (चीन) - शुक्रवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा महिला एकेरीचा उपांत्यपूर्व सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सिंधूने या विजयासह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

खाशाबा जाधवांना पद्मभूषण द्या; पृथ्वीराज चव्हांणाची मागणी

0
0
मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात चव्हाणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहले आहे.

खाशाबा जाधवांना मरणोत्तर 'पद्मभूषण' द्या, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

0
0
मुंबई - भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपटू स्वर्गीय खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहले.

वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप - पी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक, यामागुचीवर मात

0
0
नानजिंग (चीन) - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी महिला एकेरीचा उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१६, २४-२२ असा पराभव केला.

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा ; अंतिम फेरीत सिंधूचा पराभव, रौप्यपदकावरच समाधान

0
0
नानजिंग (चीन) - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी.व्ही.सिंधूला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सिंधूला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या कॅरोलिन मरिनने पराभूत केले.

सहा वेळेच्या जगतजेत्या अर्जेंटीनाला भारतीय फुटबॉल संघाचे चारली धूळ

0
0
माद्रिद - भारताच्या २० वर्षाखालील फुटबॉल संघाने सहा वेळेच्या जगतजेत्या अर्जेंटीना संघाला पराभूत केलं आहे. स्पेनमध्ये सुरू असलेल्या COTIF Cup २०१८ च्या सामन्यात भारतीय संघाने २-१ ने अर्जेंटीनाला धूळ चारली.

फेडररपाठोपाठ सेरेना विल्यम्सचीही 'रॉजर्स' कपमधून माघार

0
0
टोरंटो - अमेरिकन टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने वैयक्तिक कारणांमुळे रॉजर्स कपमधून माघार घेतली आहे. रॉजर्स कप २०१८ मध्ये सेरेनाला वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे प्रवेश देण्यात आला होता. मात्र आता तिच्या जागी जर्मनीच्या तातजॅना मारिया संधी देण्यात आली आहे.

'डोपिंग'मुळे सेरेना त्रस्त,भेदभाव होत असल्याचा आरोप

0
0
वाशिंग्टन - अमेरिकन टेनिस सुपरस्टार सेरेना विल्यम्स वारंवार होणाऱ्या डोपिंग चाचणीमुळे त्रस्त झाली आहे. याप्रकरणी आपल्याशी भेदभाव होत असल्याची एक पोस्ट तिने सोशल मीडियावर पोस्ट केली. खेळाचे वातावरण चांगले राहण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागत असल्यास, त्यासाठी आपण तयार असल्याचेही तिने सांगितले.

मीराबाई चानूच्या आशियाई स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

0
0
नवी दिल्ली - विश्वविजेती वेटलिफ्टिर मीराबाई चानूच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मीराबाई मे महिन्यापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे.

बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीसोबत 'या' खेळाडूने केलं लग्न

0
0
भारताचा टेनिसपटू सौम्यजीत घोष याच्यावर गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. यामुळे सौम्यजीतला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून वगळण्यात आले होते. आता सौम्यजीतने ज्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता तिच्यासोबत लग्न केलं आहे.

मी आता मागे वळून पाहणार नाही - सौम्यजीत घोष

0
0
नवी दिल्ली - भारतीय टेबल टेनिस संघाचा खेळाडू सौम्यजीत घोषवर १८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. अखेर आरोप करणाऱ्या मुलीशी लग्न करून सौम्यजितने आपली कारर्किद वाचविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. मी आता मागे वळून पाहणार नाही. माझ्या पुढील कारर्किदीवर लक्ष केंद्रीत करणार आहे, सौम्यजितने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे.

देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या सुरज कोकाटेचा पुण्यात सत्कार

0
0
पुणे - दिल्ली येथे झालेल्या फ्री स्टाईल ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील सुरज कोकाटेने कांस्यपदक पटकावून इंदापूरचे नाव देशामध्ये चमकवले. सुरज कोकाटे हा इंदापूरमधील सराटी गावचा आहे. त्याने ६१ किलो वजनी गटात देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे.

स्वेतलानाने पटकावले डब्ल्यूटीए वॉशिंग्टन ओपनचे विजेतेपद

0
0
टोरंटो - डब्ल्यूटीए वॉशिंग्टन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत क्रोएशियाच्या डोना वेकीचला पराभवाचा धक्का बसला आहे. दोन ग्रॅण्डस्लॅम विजेत्या रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हा हिने डोना वेकीचलाचा ४-६, ७-६, ६-२ असा पराभव केला.

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना उचलण्यास सांगितले खुर्च्या

0
0
रांची - झारखंडमध्ये पुन्हा एकदा खेळाडूचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय जंप रोप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूंना अपमानाला सामोरे जावे लागले आहे. सुवर्ण विजेत्या खेळाडूंचा सत्कार मंत्र्याच्या घरी ठेवण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमास बसण्यासाठी लागणाऱ्या खुर्च्या खेळाडूंना उचलण्यास सांगण्यात आले.

जागतिक हॉकी क्रमवारी, भारतीय महिला व पुरुष संघाच्या स्थानात सुधारणा

0
0
नवी दिल्ली - भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी जाहीर झालेल्या एफआयएच मानांकनामध्ये एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले. तर महिला संघानेही एका स्थानाने सुधारणा करत नववे स्थान गाठले आहे.

गर्भवती सानिया मिर्झा टेनिस कोर्टवर !

0
0
हैदराबाद - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा खुप दिवसांनी टेनिस कोर्टवर पाहायला मिळाली. गर्भवती सानिया फक्त टेनिस कोर्टवर उतरलीच नाही तर तिने टेनिसही खेळले. सानियाचा टेनिस खेळतानाचा व्हिडिओ लहान बहीण अनम मिर्झाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तर सानियाने टेनिस कोर्टवरचा आपला फोटो आपल्या ट्विटवर शेअर केला आहे.

जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या राहुल धोत्रेला कांस्य पदक

0
0
पुणे - चेस बॉक्सिंग अमॅच्युअर वर्ल्ड चँम्पियनशिप यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत धोत्रे यांनी भारताचे नेतृत्व केले असून पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच धोत्रे यांच्या माध्यमातून कांस्य पदक प्राप्त झाले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आशियाई स्पर्धेतील दुष्काळ मिटवू - पी.व्ही. सिंधू

0
0
हैदराबाद - आशियाई क्रीडा स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघ २०१४ च्या आशियाई खेळापेक्षां अधिक चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने व्यक्त केला आहे.
Viewing all 1366 articles
Browse latest View live




Latest Images