Quantcast
Channel: EenaduIndia | इतर क्रीडावृत्त
Viewing all 1366 articles
Browse latest View live

रॉजर्स कप - विम्बल्डन विजेत्या केर्बरला पराभवाचा धक्का, कोर्नेट अंतिम १६ मध्ये

$
0
0
माँत्रियाल - फ्रान्सची टेनिसपटू अलिझे कॉर्नेटने विम्बल्डन २०१८ ची विजेती अँजेलिक केर्बरला पराभवाचा धक्का देत मोठा विजय नोंदवला आहे. या विजयासह तिने रॉजर्स कपच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन

$
0
0
पुणे - महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनचे सचिव आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील रत्ना मेमोरियल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. प्रल्हाद सावंत यांच्या निधनानंतर क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना नेहवाल टॉप टेन मधून बाहेर

$
0
0
हैदराबाद - ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती आणि भारताची अव्वल बॉडमिंटनपटू सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली आहे. त्यामुळे सायना टॉप टेन मधून बाहेर फेकली गेली असून तीची अकराव्या स्थानावर घसरण झाली आहे.

रस्ते अपघातात गमावला होता पाय, पण आता तिला देशासाठी आशियाई खेळांमध्ये जिंकायचंय पदक

$
0
0
हैदराबाद - रस्ते अपघातात एक पाय गमवल्यानंतरही ती डगमगली नाही. जिद्द, खेळा बद्दलची आवड आणि मेहनतीच्या जिवावर तिने नुकत्याच थायलंडमध्ये झालेल्या पॅरा इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०१८ बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आणि जगाला आपली दखल घ्यायला भाग पडले. ही गोष्ट आहे मुंबईच्या मानसी जोशीची...

हिमादास झाली कोट्याधीश, 'आयओएस'शी केला करार

$
0
0
नवी दिल्ली - फिनलँडमध्ये पार पडलेल्या अंडर २० ‘जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या हिमा दासने आयओएस स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंटनेसोबत दोन वर्षाचा करार केला आहे. ही संस्था तिच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणार आहे.

BWF Ranking : सायना-श्रीकांतची घसरण,सिंधू तिसऱ्यास्थानी

$
0
0
नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीमध्ये भारताच्या सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतच्या स्थानात घसरण झाली आहे. तर पी.व्ही सिंधूचे तिसरे स्थान कायम आहे.

आशियाई स्पर्धेत निरज चोप्रा ध्वजवाहक, करणार भारतीय संघाचे नेतृत्व

$
0
0
नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर आशियाई स्पर्धेत पदकांची लयलुट करण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. या वर्षीच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. १८ व्या आशियाई स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असणार आहे.

रॉजर्स कप - विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचला स्टीफानोसकडून पराभवाचा धक्का

$
0
0
टोरांटो - ग्रीसचा टेनिसपटू स्टीफानोस त्सित्सिपासने विम्बल्डन २०१८ चा विजेता नोव्हाक जोकोविचचा पराभव करत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रॉजर्स कपच्या पुरुष एकेरीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्सित्सिपासने जोकोविचला ६-३, ६-७ ६-३ असा पराभवचा धक्का दिला.

अव्वल मानांकित राफेल नदालची रॉजर्स कपच्या उपांत्य फेरीत धडक

$
0
0
टोरांटो - एटीपीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने रॉजर्स कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शनिवारी रॉजर्स कप स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा उपांत्यपूर्व सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात स्टार खेळाडू राफेल नदालने विजय मिळविला.

सिक्कीममध्ये अपघातात चार फुटबॉल खेळाडूंचा मृत्यू

$
0
0
गंगटोक - देशभरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण भारत आणि पूर्व भारतात तर पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे सिक्कीममध्ये चार फुटबॉल खेळाडूंना आपला जिव गमवावा लागलाय. तर, ६ जण गंभीर जखमी आहेत.

लिओनल मेस्सीकडे बार्सिलोनाच्या कर्णधारपदाची धुरा

$
0
0
बार्सिलोना - स्पॅनिश फुटबॉल क्लब असलेल्या बार्सिलोनाने अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला बार्सिलोनाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. आंद्रेस इनिएस्तानंतर मेस्सीकडे कर्णधार पदाची धुरा सोपावण्यात आली आहे.

स्वतंत्र भारताने आजच्या दिवशीच जिंकले होते पहिले ऑलिम्पिक गोल्ड

$
0
0
नवी दिल्ली - भारताच्या क्रीडा क्षेत्रात विशेष करुन हॉकी प्रेमी आणि खेळाडूंसाठी तसेच सर्वच भारतीयांसाठी आजचा दिवस फारच खास आहे. आजपासून ७० वर्षांपूर्वी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली लंडनमध्ये झालेल्या १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते. त्यामुळे भारतासाठी आजचा दिवस फारच अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. भारतासाठी ऐतिहासिक ठरलेला हा क्षण १५ ऑगस्टला चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

'भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी आम्ही लग्न केलं नाही'

$
0
0
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा सध्या गर्भवती आहे. त्यामुळे तिच्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळू शकतं, यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यावर आता सानियाने खळबळजनक उत्तर दिलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत, म्हणून मी हे लग्न केलेलं नाही, असे विधान सानियाने केले आहे.

६१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने पूर्ण केली आयरन मॅन स्पर्धा

$
0
0
पुणे - पुण्यातील दशरत जाधव या ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने जर्मनीतील हॅम्बर्ग येथे पार पडलेली आयरन मॅन २०१८ स्पर्धा पूर्ण केली आहे. अत्यंत अवघड आणि कठीण समजली जाणारी आयरन मॅन स्पर्धा दशरथ जाधव यांनी यशस्वीरित्या पूर्ण करून विदेशात देशाचे नाव उंचावले आहे.

भारतीय बॅडमिंटन संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

$
0
0
हैदराबाद - देशभरात आज मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आज भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने भारतीय बॅडमिंटन संघाने देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. १८ ऑगस्टपासून भारतीय बॅडमिंटन संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जकार्ताला रवाना होत आहे.जकार्ताला निघण्यापूर्वी भारतीय संघाने देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

पाक स्वांतत्र्यदिनी शुभेच्छा देणाऱ्या 'त्या' व्यक्तीला सानियाचे सडेतोड उत्तर

$
0
0
नवी दिल्ली - शोएब मलिकसोबत लग्न केल्यापासून टेनिसपटू सानिया मिर्झा कायमच सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. आतादेखील सानिया मिर्झाला त्रास देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. नुकतेच ट्विटरवर एका व्यक्तीने सानिया मिर्झाला पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत ट्रोल करण्यचा प्रयत्न केला. सानिया मिर्झाने मात्र नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत त्याला जबरदस्त उत्तर दिले आहे.

आशियाई स्पर्धा : मुष्टियोद्धा विकास रचणार इतिहास ?

$
0
0
नवी दिल्ली - 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन इंडोनेशियामध्ये करण्यात आले आहे. जकार्ता आणि पालेमबांग या दोन शहरांत येत्या 18 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरूवात होईल. क्रीडा वर्तुळाच्या नजरा मुष्टियोद्धा विकासच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.

लिएंडर पेसची एशियन गेम्समधून माघार, योग्य जोडीदार नसल्याने नाराज

$
0
0
नवी दिल्ली - भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने एशियन गेम्समधून माघार घेतली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये पेस पुरूष दुहेरीमध्ये खेळणार होता. पेससोबत कोण खेळणार हे नक्की नसल्याने नाराज होऊन ४५ वर्षीय पेसने स्पर्धेतून माघार घेतली.

लवकरच येणार टेनिसचा विश्वचषक

$
0
0
मुंबई - टेनिसप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे टेनिस चाहत्यांना आता विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

एशियन गेम्सची पदके अटलजींना समर्पित करणार - ब्रीजभूषण

$
0
0
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. वायपेयींच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतरत्न अटलजींच्या स्मृतिप्रित्यर्थ एशियन गेम्समध्ये खेळाडूंनी जिंकलेली पदके अटलजींना समर्पित करण्यात येणार आहेत.
Viewing all 1366 articles
Browse latest View live


Latest Images