Quantcast
Channel: EenaduIndia | इतर क्रीडावृत्त
Viewing all 1366 articles
Browse latest View live

खराब दर्जाचे जेवण दिल्याने हुकले पदक, पी.टी. उषाचा धक्कादायक खुलासा

$
0
0
देशातील माजी वेगवान धावपटू पी.टी उषाने ३४ वर्षांनंतर एक धक्कदायक खुलासा केला आहे. १९८४ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खराब दर्जाचे जेवण दिल्याने आपला पराभव झाल्याचे वक्तव्य पी.टी उषाने केले आहे.

इसोव अल्बानची नेत्रदीपक कामगिरी, 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय

$
0
0
हैदराबाद - भारतीय सायकलपटू इसोव अल्बानने नवा इतिहास रचला आहे. स्वित्झर्लंड येथे झालेल्या ज्यूनियर ट्रॅक सायकलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत अंदमान-निकोबारच्या इसोव अल्बाननेने केइरीन या प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे.

ASIAN GAMES २०१८ - आज रंगणार आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

$
0
0
जकार्ता - आजपासून १८व्या आशियाई स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आज रात्री जकार्ताच्या गिलोरा बंग कर्नो या स्टेडियमवर या स्पर्धेचा दिमाखदार उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान या स्पर्था होणार आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धा : वाचा, स्पर्धेचा इतिहास आणि पार्श्वभूमि

$
0
0
नवी दिल्ली - आजपासून १८ व्या आशियाई स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आज रात्री जकार्ताच्या गिलोरा बंग कर्नो या स्टेडियमवर या स्पर्धेचा दिमाखदार उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या अनुषंगाने, स्पर्धेचा इतिहास आणि पार्श्वभूमि जाणून घेऊया...

Asian games 2018 Opening Ceremony: ४५ देशांतील सुमारे १० हजार खेळाडू होणार सहभागी

$
0
0
जकार्ता - इंडोनेशियात होणाऱ्या १८ व्या आशियाई स्पर्धेचा भव्य उद्धाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो (जीबीके) या मुख्य स्टेडियममध्ये पार पडला आहे. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ - 'या' खेळांमध्ये दिसणार भारतीय खेळाडूंचा 'जलवा'

$
0
0
स्पोर्टस् डेस्क - आशियाई खेळांच्या १८ व्या स्पर्धेचे उद्घघाटन शनिवारी झाले. या वर्षीची ही स्पर्धा इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होत आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकानूसार आज प्रथमच भारतीय खेळाडू या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवतील.

एशियन गेम्स २०१८ - भारतीय महिला बॅडमिंटन संघासाठी गुड न्यूज

$
0
0
आशियाई स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. त्याचबरोबर भारतीय महिला बॅडमिंटन संघासाठी आनंदाची बातमी आली. शनिवारी बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले. या वेळापत्रकामध्ये भारतीय महिला संघाला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.

एशियन गेम्स २०१८ - भारताने उघडले पदकांचे खाते, २० मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत कांस्य

$
0
0
जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे.

एशियन गेम्स २०१८ - हेवेदावे विसरून कट्टर वैरी आले एकत्र

$
0
0
जकार्ता - खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे काम करत असतो आणि याची प्रचिती १८ व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात आली. दक्षिण आणि उत्तर कोरिया हे एकमेकांचे कट्टर वैरी असलेले देश वाद विसरून एकत्र आले.

VIDEO - एशियन गेम्समधील इंडोनेशियन अध्यक्षांची ही 'फास्ट अँड फ्यूरिअस' एंट्री बघाच

$
0
0
जकर्ता - आशियाई खेळांच्या महाकुंभाला इंडोनेशियामध्ये शनिवारी सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा दिमाखदार झाला. उद्धाटन सोहळ्यात चर्चा झाली ती इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्या फास्ट अँड फ्यूरिअस एंट्रीची..

एशियन गेम्स २०१८ - भारताला मोठा धक्का, सुशील कुमार पहिल्याच फेरीत पराभूत

$
0
0
जकार्ता - आशियाई खेळांच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जात असलेल्या सुशील कुमारला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

Asian Games : कुस्तीपट्टू बजरंग पुनियाकडून पहिले ' गोल्ड ', शुटींगमध्ये अपुर्वी व रविला कांस्य

$
0
0
जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १८ व्या अशियायी खेळांचे उद्घाटन झाल्यानंतर रविवारपासून मुख्य स्पर्धांना दिमाखात सुरूवात झाली. २०१८ अशियायी खेळांमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले असून कुस्तीपट्टू बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात फ्रिस्टाईल प्रकारात भारताला हे पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.

Asian Games : बजरंगचे पहिले 'सुवर्ण' पदक अटलजींना समर्पित

$
0
0
जकार्ता - आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपले पदक दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले. बजरंगने ६५ किलो वजनी गटात फ्रिस्टाईल प्रकारात भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

एशियन गेम्स २०१८ - १० मीटर एअर रायफल प्रकारात दीपक कुमारला रौप्य

$
0
0
जकार्ता - आशियाई स्पर्धा २०१८ च्या दुसऱ्या दिवसाला आज सुरुवात झाली असून भारतीय नेमबाज दीपक कुमार याने रोप्य पदकाची कमाई केली आहे.

एशियन गेम्स - रेड लाईट एरियात फिरल्याने जपानच्या ४ खेळाडूंची हकालपट्टी

$
0
0
जकार्ता - इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. जपानच्या ४ बास्केटबॉल खेळाडूंना निलंबीत करुन मायदेशी धाडण्यात आले आहे.

'सुवर्ण' कामगिरी करणाऱ्या बजरंगकडे एकेकाळी तुपासाठीही नव्हते पैसे

$
0
0
नवी दिल्ली - रविवारपासून आशियाई खेळ २०१८ ला सुरुवात झाली आहे. यात पहिल्याच दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत केले. या बरोबरच बजरंगने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पण, बजरंगचा हा प्रवास फार सोपा नव्हता. एक वेळ अशी होती की, त्याला पोषक आहारासाठी लढावे लागत होते. बजरंगच्या या सुवर्ण कामगिरीवर टाकूया एक नजर..

एशियन गेम्स २०१८ - भारतीय महिला बॅडमिंटन संघाचे आव्हान संपुष्टात

$
0
0
जकार्ता - आशियाई खेळ २०१८ मधून भारतीय महिला बॅडमिंटन संघ बाहेर पडला आहे. रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने भारताला विजयी सुरूवात करून दिली, परंतु अन्य खेळाडूंनी जपानसमोर हार पत्करली. यामुळे जपानने 3-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली.

कुटुंबीय केरळमधील पुरात,अन् देशासाठी पदक जिंकण्यासाठी तो आशियाई स्पर्धेत

$
0
0
जकार्ता - १८ व्या आशियाई स्पर्धेला सुरूवात झाली असून भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. कुस्ती, नेमबाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केली. तर जलतरणपटू साजन प्रकाश याने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम पेरीत धडक दिली आहे. यामुळे पदकाच्या आशा वाढल्या आहेत.

AsianGames2018- विनेश फोगाटने 'सुवर्ण' जिंकून रचला इतिहास

$
0
0
जकार्ता - भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतासाठी हे आतापर्यंतचे दुसरे सुवर्णपदक ठरले. विनेशने ५० किलो वजनीगटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. महिला कुस्तीमधील हे पहिले सुवर्णपदक आहे.

Asian Games 2018 : पुरूष हॉकी; भारताने इंडोनेशियाचा उडवला १७-०ने धुराळा

$
0
0
जकार्ता - सुवर्णपदकाचे दावेदार असलेल्या भारताच्या पुरूष हॉकी संघाने आशियायी गेम्सच्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. भारताने पूल ए च्या पहिल्याच सामन्यात इंडोनेशियाचा १७-०ने फडशा पाडला. भारताच्या आक्रमक व धारदार खेळापुढे इंडोनेशियाने शरणागती पत्करली. मागील आशियायी गेम्सचा भारत सुवर्णविजेता असून यावेळेसही हा संघ सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार आहे.
Viewing all 1366 articles
Browse latest View live




Latest Images