Quantcast
Channel: EenaduIndia | इतर क्रीडावृत्त

चॅम्पियन्स लीग: उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोना आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात लढत

$
0
0
नवी दिल्ली - युएफाने शुक्रवारी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचे ड्रॉ घोषित केले आहेत. यात लिओनेल मेस्सीचा बार्सिलोना आणि मँचेस्टर युनायटेड या दिग्गज क्लबमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. बार्सिलोनाने नॉकआउट सामन्यात ऑलिंपिक ल्योंचा पराभव केला तर मँचेस्टर युनायटेड पॅरिस सेंट जर्मेनवर (पीएसजी) मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

२०२० साली भारतात होणार महिलांचा अंडर-१७ फिफा विश्वकरंडक

$
0
0
नवी दिल्ली - २०२० साली महिलांच्या अंडर-१७ फिफा विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. मियामी येथे फिफा कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत फिफाने अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन याची माहिती दिली आहे. फिफाची महिलांची कोणतीही स्पर्धा आयोजित करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

$
0
0
नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. भारतासाठी फुटबॉलमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सोहळ्यात छेत्रीला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

बछेंद्री, बजरंग, छेत्रीसह ९ खेळाडू पद्म पुरस्काराने सन्मानित

$
0
0
दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील ४७ जणांना पद्म पुरास्काराने सन्मानित केले. त्यात ९ खेळाडूंचा समावेश आहे. १९८४ साली माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बछेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पद्मभूषणने सन्मानित

$
0
0
नवी दिल्ली - गिर्यारोहक बचेंद्री पाल यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ६४ वर्षाच्या असलेल्या बचेंद्री पाल या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱया पहिल्या भारतीय महिला आहेत. १९८४ साली त्यांनी माउंट एव्हेरस्ट सर केले होते.

फायनलचे तिकीट पटकावण्यासाठी फेडरर-नदाल आमने-सामने

$
0
0
इंडियन वेल्स (अमेरिका) - इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्य फेरीत टेनिस जगतातील २ दिग्गज खेळाडू एकमेंकांसमोर उभे ठाकणार आहेत. 'क्ले कोर्टचा राजा' स्पेनचा राफेल नादाल आणि टेनिसचा सम्राट म्हणून ओळख असलेला रॉजर फेडरर फायनलचे तिकीट पटकावण्यासाठी आमने-सामने येणार आहेत.

इंडियन वेल्स मास्टर्सच्या उपांत्य फेरीत राओनिकसमोर डोमिनिकचे आव्हान

$
0
0
इंडियन वेल्स (अमेरिका) - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीम आणि कॅनडाच्या मिलोस राओनिक यांच्यात इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना राफेल नादाल आणि रॉजर फेडरर यांच्यात होईल.

इंडियन वेल्स मास्टर्सच्या अंतिम फेरीत फेडररला पराभवाचा धक्का

$
0
0
इंडियन वेल्स (अमेरिका) - इंडियन वेल्स टेनिस मास्टर्सच्या अंतिम फेरीत रॉजर फेडररला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने फेडररवर ३-६, ६-३,७-५ ने मात करत विजेतपदाला गवसणी घातली.

परभणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गंगाखेडने मारली बाजी

$
0
0
परभणी - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ५० किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणसंख्येने आघाडी घेऊन गंगाखेड संघाने कोल्हा संघावर विजय मिळवला. ही स्पर्धा पाथरी येथे कबड्डी महर्षी स्व. बुवासाहेब साळवी क्रिडा मैदानावर उशिरापर्यंत रंगली होती.

बंगळुरू एफसीने पटकावले इंडियन सुपर लिगचे विजेतेपद

$
0
0
मुंबई - सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरू एफसीने इंडियन सुपर लिगचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या आयएसलच्या अंतिम सामन्यात राहुल भेकेने ११७ व्या मिनिटाला केलेल्या शानदार गोलमुळे बंगळुरूने एफसी गोवावर १-० ने विजय मिळवला. या विजयासह आयएसलमधील आपले पहिले वहिले जेतेपद मिळवण्याचे स्वप्न बंगळुरू एफसीने पूर्ण केले आहे.


Latest Images